-->
सामाजिक

कोरोना काळात विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक हेळसांड थांबवावी ; आ. पडळकर यांच्याकडे आभाविप ची निवेदनाद्वारे मागणी.

प्रतिनिधी:

कोरोणाची पार्श्वभूमी असताना महाराष्ट्र सरकार व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची लावलेली आर्थिक हेळसांड थांबवावी व या परिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यात याव्यात या बद्दल विधानपरिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने करमाळा येथे निवेदन देण्यात आले.कोरोणाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक हेळसांड थांबवावी ,अधिवेषनात विद्यार्थी हिताचा विषय मांडावा ही विनंती
या निवेदना मध्ये विद्यार्थी हिताचे १३ विषय मार्गी लावण्या बद्दल विनंती करण्यात आली.
तसेच MPSC च्या विद्यार्थ्यांसाठि आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या जबरदस्त आंदोलना बद्दल आभार मानले , विद्यार्थी हिताचे विषय विधानसभेत नक्कीच मांडणार असे आश्वासन यावेळी पडळकर यांनी उपस्थितांना दिले .

या वेळी जिल्ह्याचे सहसंयोजक शुभम बंडगर , सौरभ शिंगाडे , संतोष कांबळे ,प्रसाद कोकीळ,विश्वजीत चिवटे,श्रेयस ढाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close