प्रतिनिधी/महेश कामटे


वडशिवणे करमाळा तालुक्यातील वडशिवणे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्यासदृश्य प्राण्याने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. याकडे वन विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त भेटी देण्यापेक्षा उपाय करणे गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी अशीच बिबट्या ची दहशत करमाळा तालुक्यात होती. नंतर काही दिवस गायब झालेला बिबट्या सदृश्य प्राणी आढळुन आला आहे.
दोन दिवसांपासून वडशिवणे परिसरात ठाण मांडून बसलेला बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. पण हेच जर एखाद्या मनुष्यचा बळी गेला तरच वनविभाग सावध होईल का..? अशी चर्चा गावकऱ्यांमधुन सुरू आहे. तसेच ऊस तोडणीसाठी बाहेर गावावरून आलेले मजुर यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण झाले आहे. कारण, राहण्यासाठी पक्का निवारा नाही, शेतात काम करता येईना, कारण परिसरात बिबट्याची दहशत आहे आणि वन विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे.




