-->
करमाळासामाजिक

सावडीफाटा- दिवेगव्हाण रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात; ग्रामस्थांनच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

सावडीफाटा ते दिवेगव्हाण (ता. करमाळा) हा महत्त्वपूर्ण रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून खराब अवस्थेमुळे वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. शेतकरी, विद्यार्थी, कामगार व महिला प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने आता या समस्येवर दिलासा मिळाला असल्याचे नागरिकांमधून सांगितले जात आहे.

 

डॉ. अमोल दुरंदे यांचा ठाम पाठपुरावा

रस्त्याच्या कामाचा प्रशासकीय मार्ग सुकर करण्यासाठी डॉ. अमोल दुरंदे व दिवेगव्हाण चे सरपंच प्रतिनिधी हनुमंत खाटमोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून व त्यांना निवेदन देऊन या रस्त्याच्या दुरुस्तीविषयी सतत पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारी, प्रत्यक्ष पाहणी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांची माहिती प्रशासनाला दिली. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close