-->
करमाळासामाजिक

दिंगबरराव बागल विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; वृक्षारोपण करून जपली मित्राची आठवण

 

प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण

जागतिक जैवविविधता दिन व स्मृतीदिनाचे औचित्य साधत वडाचे झाड लावून स्व. तात्यासाहेब सुर्वे यांना कुंभेज (ता.करमाळा) येथील दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयातील वर्गमित्र, माजी विद्यार्थी आणि यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन करमाळा यांचे वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
मागील वर्षी कोविड-19 संसर्गाने कुंभेज येथील बागल विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्व. तात्यासाहेब सुर्वे आणि त्याचे वडील, आदिनाथ स.सा. कारखान्याचे माजी संचालक स्व. नानासाहेब सुर्वे या दोघा पिता-पुत्राचा मृत्यु झाला होता. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने कुंभेज मधील लहानथोरांना मोठाच धक्का बसला होता. या दुःखद घटनेला वर्ष पूर्ण होत असताना आपल्या या जीवलग मित्राची स्मृती कायम रहावी. यासाठी एक वडाचे झाड लावून निसर्ग सेवेबरोबरच मित्रत्वाचा भावनिक बंध जोपासला आहे.

कोविड काळात प्राणवायू ऑक्सीजन अभावी असंख्य रुग्णांचे प्रचंड हाल झाले. यासाठी ऑक्सीजन निर्मितीचे खर्चीक प्रकल्प उभे करावे लागले. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ, शुद्ध हवा मिळणं हे जीवनावश्यक आहे. काळाची गरज ओळखून यावरील दीर्घकालीन व लाभदायी उपाययोजना होणे गरजेचे असताना यावर एक पर्याय म्हणून वर्गमित्र व यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन यांनी हे प्रातिनिधीक वृक्षारोपण केले.

या अनुषंगाने पक्षीमित्र कल्याणराव साळुंके सर यांनी वृक्षप्रेमी सिने-नाट्य अभिनेते सयाजी शिंदे यांच्या कार्याची ओळख व सह्याद्रि देवराई मार्फत तसेच महाराष्ट्रभर सुरू असलेल्या अन्य स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळीविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्वांनी झाडाचं महत्व विषद करणारी वृक्ष प्रतिज्ञा केली आणि वृक्षसंवर्धनातून जैवविविधता समृद्ध करण्याचा निर्धार केला.

यावेळी सरपंच श्री. अंकुश गायकवाड, सूर्वे कुटुंबातील श्री.सौदागर सूर्वे, गुरुदास सूर्वे, गणेश सूर्वे, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके सर, माजी ग्रा.पं. सदस्य पैगंबर पठाण, ह.भ.प. तात्या महाराज मिसाळ, भारत पवार, किशोर कदम, सोमनाथ कन्हेरे, आण्णा कादगे, संतोष घोरपडे, विजय राऊत, नितीन भोसले, प्रकाश पवार ,सचिन पवार, विशाल पवार, तसेच बागल विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close