
केम प्रतिनिधी/संजय जाधव


केम तालुका करमाळा येथील शिवसेना शाखेच्या वतीने स्व. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्त स्व. हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन युवा सेनेचे सागर राजे तळेकर व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. हरी भैय्या तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कामगार काॅलनी मधील बिहारी कामगारांना व त्यांच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी अच्युत काका पाटील, शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख ऊत्तरेश्वर तळेकर, अविनाश तळेकर, महावीर तळेकर, महादेव पळसकर, नवनाथ खानट, ऊत्तरेश्वर टोंपे, सोमा रंदवे, शिवा मोरे, धनंजय ताकमोगे, वसंत तळेकर, हनुमंत रंदवे गुरूजी, नवनाथ देवकर, ऊत्तरेश्वर गोडगे, रमेश कांतीलाल तळेकर, गोविंद तळेकर, समाधान गुरव, महेश तळेकर सर आदी शिवसैनिक उपस्थित होते.



