-->
करमाळाराजकिय

शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न; मेळावा घेऊन वरिष्ठ नेत्यांसमोर भुमिका जाहीर करण्याचा निर्धार!

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, तालुका संपर्कप्रमुख राजू राणे, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल यांच्या आदेशाने माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शिवेसना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील संपर्क कार्यालयात आज संपन्न झाली.

 

महाविकास आघाडीमध्ये माढा लोकसभेची जागा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली असून दोन दिवसात उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत शिवसेना महत्त्वाचा पक्ष असून करमाळा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकांची संख्या ३० ते ३५ हजारांहून अधिक आहे. मात्र मागील अनूभव पाहता निवडणुक झाल्यानंतर विजयी झालेल्या खासदारांकडून शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. भविष्यात शिवसैनिकांवर अशी वेळ येता कामा नये यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेऊन शिवसैनिकांचे मत वरिष्ठांपर्यंत पोहचवून निर्णय घेण्याचे एकमताने ठरले आहे. मेळावा होईपर्यंत शिवसेनेचा एकही पदाधिकारी अथवा शिवसैनिक प्रचारात सक्रिय होणार नाही असे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, तालुका संघटक प्रवीण कटारीया, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर यांनी जाहीर केले.

 

मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले असून या बैठकीत मेळाव्याची तारीख व ठिकाण जाहीर होणार आहे. तसेच संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांच्याशी चर्चा करून संजय राऊत यांची वेळ भेटते का यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

या बैठकीस उपतालुकाप्रमुख अ‍ॅड. विकास जरांडे, बंडू शिंदे, उपशहरप्रमुख पंकज परदेशी, संतोष गानबोटे, माजी विभाग प्रमुख अविनाश गाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा सचिव आदेश बागल, केम शिवसेना शहरप्रमुख सतीश खानट, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, करमाळा युवासेना शहरप्रमुख समीर हलवाई, युवासेना उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे, अभिषेक मोरे, माऊली फरतडे, रामेश्वर पांढरमिसे, युवासेना शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, भिमक्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष शहाजीराव धेंडे लालू कुरेशी, भाऊ मस्तुद, विभाग प्रमुख, मयुर तावरे, सोमनाथ पौळ, शिवाजी नाईकनवरे, शाखा प्रमुख ओकांर कोठारे, माजी गटप्रमुख व माजी उप सरपंच विजय माने, माजी गटप्रमुख व माजी उपसरपंच जोतीराम घाडगे शिवसेना शाखा प्रमूख माजी उपसरपंच उत्तम हनपूडे शाखा प्रमुख दिगंबर काटूळे, यांच्यासह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते. प्रास्ताविक युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close