-->
आरोग्यकरमाळा

‘या’ प्रा.आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भराव्यात; जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 

 

माय मराठी न्युज/केम प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या केम ‌येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी केमचे सुपुत्र, सोलापूर जिल्हा परिषद ‌अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकूण १७ गावे जोडलेली आहेत. या गावांची लोकसंख्या ‌३५ हजाराच्या आसपास ‌आहे‌. या आरोग्य केंद्रा अंतर्गत एकूण चार उपकेंद्रे असून ती कंदर, पांगरे, निंभोरे व घोटी या गावात आहेत. या आरोग्य ‌केंद्रासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण १६ पदे मंजूर आहेत. परंतु ‌त्यापैकी फक्त ५ पदे भरलेली आहेत तर ११ जागा रिक्त आहेत. कोरोना परिस्थिती मुळे आरोग्य ‌सेवा‌ महत्वाची ‌असल्याने या प्राथमिक ‌आरोग्य केंद्रात लसीकरण कॅम्प मोठ्या प्रमाणावर होत आहे‌त. सरासरी प्रत्येक दिवशी एक हजार लसीकरण झाले आहेत. लसीकरण सुरळित‌ पार पाडण्यासाठी या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय ‌अधिकारी डॉ. संतोष पालखे यांच्या मार्गदर्शनाखाली ‌येथील आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस सेवा करीत‌ आहेत. कर्मचारी संख्या अपुरी ‌असल्याने या कर्मचाऱ्यांवर जास्त ताण पडत आहे. सध्या करमाळा तालुक्यात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे‌. येथील कर्मचारी शाळेत तपासणी साठी गेल्यानंतर आलेल्या रूग्णांची सेवा फक्त एकाच डॉक्टरला करावी लागते. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील रिक्त पदांची भरती त्वरीत‌ करावी‌.

अजून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामध्ये डेटा प्लस सारखा रोग निघाला आहे. कोरोना काळात येथील आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. सातोली, वडशिवणे, कंदर येथे कोरोनाचे रुग्ण मोठया‌ प्रमाणावर होते. तसेच या आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका ही नादुरुस्त आहे.

         एका गरीब कुटुंबातील महिलेला सर्पदंश झाला असता त्वरित उपचार करण्यास नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सदर महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तरी या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेली रुग्णवाहिका त्वरित मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close