-->
करमाळा

नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

करमाळा/प्रतिनिधी

 

श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजयकुमार दोषी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झेंड्याला मानवंदना देण्यात आली.

 

नवभारत इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तसेच श्री गिरधरदास देवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास केले व झेंड्याला सलामी दिली. या प्रसंगी भारत माता, लाल बहादूर शास्त्री, मेरी कोम अशा विविध वेशभूषेत बालविद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपली भाषणे सादर केली.

 

शाळेचे अध्यक्ष श्री. कन्हैयालालजी देवी व सौ. सुनीता देवी मॅडम तसेच मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहिते यांनीही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आश्विनी क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नरतोडेकर सर यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होता. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close