माय मराठी न्युज


उत्तर प्रदेश मधील नोएडातील सूरजपूर भागातील खोडना खुर्द गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ५८ गायींना विषबाधा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पूर्वी पीडित व्यक्तीकडे काम करायचा. आपल्याला नोकरीवरून काढल्याच्या सूडबुद्धीने त्याने ५८ गायीला विष देऊन ठार केले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, खोडना खुर्द गावात राहणाऱ्या ओमवीर नागरची दूध डेअरी आहे. तेथे त्यांनी गायी पाळल्या आहेत. ओमवीर नागर यांच्या गोठ्यातील ५८ गायींचा ५ दिवसांत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला असल्यामुळे त्यांनी सदर घडलेल्या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गायीच्या संशयास्पद मृत्यूंचे कारण माहिती करून घेण्यासाठी पशुवैद्यकांच्या पथकाला बोलावून तपास केला. त्यावेळी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विष प्राशन केल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी शनिवारी ओमवीर नागरचा जुना नोकर धर्मेंद्र याला अटक केली. चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की, धर्मेंद्रला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. याच कारणामुळे त्याने सुबुद्धीच्या हेतुने गाईंना पाजणाऱ्या पाण्यात विष मिसळले. त्यामुळे ते विषयुक्त पाणी प्यायल्याने ५८ गाईंचा मृत्यू झाला.©®wb




