-->
करमाळासामाजिक

निंभोरे येथील जिल्हा परिषद शाळेकडून पर्यावरणपूरक दिंडीचे आयोजन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज शुक्रवार दिनांक ०८ जुलै रोजी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने शैक्षणिक आणि पर्यावरण पूरक संदेश देण्यासाठी दिंडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या दिंडीच्या निमित्ताने गावात शैक्षणिक तसेच पर्यावरणाचे रक्षण यासाठी संदेश देण्यात आला. दिंडीच्या निमित्ताने विविध खेळ घेऊन महाराष्ट्राची लोक परंपरा कायम अबाधित राहावी असा संदेश दिला.

दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गावातील प्रतिष्ठित समाजसेवक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रविदादा वळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद रुपी अल्पोपहार दिला. तसेच लुनावत परिवाराकडून विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी रविदादा वळेकर, भालुकाका गुरव, नाथाभाऊ शिंदे, दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर, ईश्वर मस्के, ज्ञानेश्वर वळेकर, समाधान कारंडे, गणेश वळेकर आदी ग्रामस्थ तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, मुध्याध्याक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close