-->
करमाळाविशेष

मांजरगाव येथील चैतन्य कुलकर्णीचा ‘डिजीटल मार्केटिंग एक्सलन्स आवार्ड’ ने सन्मान

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभ प्रसंगी मांजरगाव (ता. करमाळा) येथील चैतन्य महेश कुलकर्णी यास एवढया लहान वयात डिजिटल मार्केटिंगमध्ये उत्तुंग यश मिळवल्याबद्दल रविवार दि. २० ऑक्टोंबर रोजी सन्मानित करण्यात आले.

 

चैतन्य यांनी संस्थेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल, ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते Digital Marketing Excellence Award देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तो पुण्यामध्ये सध्या बी.सी.ए चे शिक्षण घेत आहे तसेच तो ऑनलाईन मार्केटिंग चे क्लास घेत असुन पुण्यातुन स्वतः ची मेटा टेक मॅनेजर ही ॲड एजन्सी चालवत आहे. अनेक कंपन्यांच्या मेटा ॲड कँपीयन चालवत आहे. तसेच डिजीटल क्षेत्रात विविध प्रोजेक्ट वर तो काम करत आहे. अतिशय कमी वयात या क्षेत्रात तो कार्यरत आहे.

 

संस्थेच्या डिजिटल प्रगतीत चैतन्य यांनी केलेले कार्य हे एक आदर्श आहे आणि त्यांचे यश त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. असे प्रतिपादन श्री. उमेश कुलकर्णी गुरूजी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close