
प्रतिनिधी /ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे अंजनडोह येथील ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी (करमाळा तालुका) तसेच बागल, जगताप व पाटील गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बिनविरोध केली आहे. सरपंच पदासाठी सौ. पल्लवी अमोल शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
सदर ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी भाजपा मागासवर्गीय युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष हनुमंत रणदिवे यांनी तसेच बागल, जगताप, पाटील व झोपडपट्टी सुरक्षा दल या गटाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन ही ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे. यावेळी नूतन सरपंच प्रतिनिधी म्हणून अमोल शेळके यांचा करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालयात भाजपचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

या सत्कार समारंभा प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, अंजनडोह येथील अरुण अण्णा शेळके, सुभाष काका बलदोटा, हाजीत रणदिवे, अशोक शेळके, अरुण जाधव, धनराज शिंदे, बाबुराव शेळके, नवनाथ शेळके, अमोल शेळके, आनंद साळुंखे, दीपक शेळके, संतोष भोसेकर, मोहम्मद सोनवणे, संतोष पिसाळ, रंगनाथ शेळके व ग्रामस्थ तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



