प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम करमाळा विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे.
यामध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात येतील. तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात येवून त्यांची विविध योजनांसाठी निकषाप्रमाणे निवड करण्यात येईल.
तरी शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी खडकी, जातेगाव, आळजापुर, कामोणे, पूनवर, वडगाव उत्तर व दक्षिण, बिटरगाव, पोथरे, मांगी या गावांतील नागरिकांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन जि. प. शाळा जातेगाव येथे सकाळी ०९:३० ते सायं.०५:३० या वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन आ. संजय मामा शिंदे संपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे.




