-->
आरोग्यकरमाळासामाजिक

परांडा तालुक्यातील खानापूर चे अब्दुल अरब चालवतात दोनशे वर्षांपासूनची ‘ही’ परंपरा

केम प्रतिनिधी /संजय जाधव

परंडा तालुक्यातील खानापूर येथील अब्दुल ईनाम अरब यांच्या चौथ्या पिढी मध्ये म्हणजे दोनशे वर्षापासून ढाळ देण्यासाठी व दारू सोडविण्यासाठी झाडपाल्याचे औषध देण्याची सेवा सुरू आहे. या मध्ये पोट दुखणे, फुगणे, गॅस धरणे, नळ फुगणे, पित्त होणे, डोके दुखी छाती दुखी, पोटात जळजळ करणे, भूक न लागणे अपचन होणे, पोटात मुर्डा होणे, खोकला इत्यादी वर झाडपाल्याचे आयुर्वेदिक खात्रीशीर औषध देत आहेत. चौथ्या पिढीतील खाजा अब्दूल अरब हे आता वारसा चालवत आहेत.

सोनारी परांडा रोडवर खानापूर फाट्यावर एक टपरी टाकली आहे. त्यांच्याकडे येणारे रूग्ण सकाळी अणुषा पोटी, काही न खाता ढाळ घेण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर त्या रूग्णांची नाडी परिक्षा केली जाते. त्यानंतर त्याला पानाच्या विडयामध्ये औषध देऊन खायला लावतात. तसेच ताक पेयला देतात हे दिल्यानंतर हळू, हळू त्या रूग्णाच्या ऊलट्या होतात आणि जळमळे बाहेर पडतात. त्याच्या पोटातील लिव्हर, आतडीतील पित्त, ऊष्णता, अल्कोहोल निघून जाते व किडण्या मजबूत होतात. पचनक्रिया सुधारते, एका ढाळात शंभर टक्के रुग्ण बरा होतो. परंतु अलीकडे ढाळ घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आजकाल रुग्ण ढाळ घेण्यासाठी भितात. ते डाॅक्टरांकडे जाऊन त्या ठिकाणी सोनोग्राफी करतात व त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाने औषध ऊपचार घेतात. त्यासाठी रुग्णाला हजारो रूपये खर्च येतो. पण, आम्ही मात्र नाममात्र फी घेतो जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा मानतो.

आमच्याकडे पंढरपूर, माढा, करमाळा, पंराडा, बार्शी तालुक्यातील रूग्न ढाळ घेण्यासाठी येतात. त्यांना शंभर टक्के फरक पडत असल्याचा अनुभव ते रुग्ण आम्हाला सांगत आहेत, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक रुग्णांनी सहा महिन्याला ढाळ घेतलाच पाहिजे. आपण ज्या प्रमाणे ठराविक दिवसानंतर गाडी ची ओव्हर ऑईलिंग करतो. त्याप्रमाणे, आपल्या शरीराचे सुद्धा चेक अप केले पाहिजे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close