करमाळा प्रतिनिधी : शंभूराजे फरतडे


करमाळा तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. लसीकरणा बरोबरच गावोगावी कोविड चाचणी कॅम्प आयोजित करुन नागरींकाची तपासणी केली जात असून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाचे तात्काळ विलगीकरण करुन उपचार केले जात आहेत.
या अनुषंगानेच काल सौंदे ता . करमाळा येथे कोरोना चाचणीचा कॅम्प आयोजित केला गेला होता यास नागरींनी भरघोस प्रतिसाद दिला असुन तब्बल 198 जणांनी तपासणी करून घेतली .या मध्ये 115 अॅन्टीजिन तर 83 जणांच्या आरटीपिसीआर टेस्ट घेण्यात आल्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सौंदे येथे कोविड रुग्ण आढळून आले होते मात्र गेल्या दोन महिन्यांपासून गावात एकही रुग्ण आढळून आला नव्हता मात्र खबरदारी म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने आज तपासणी शिबीर आयोजित केले होते या मध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून लगेच विलगीकरण करुन उपचार सुरु केल्याने पुढील धोका टळला आहे.
या तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवक डाॅ दाऊद शेख,आरोग्य साह्यक नर्सिंग भोंग, आशा सेवीका अपर्णा वारे, ग्रामसेवक बागुल भाऊसाहेब, तलाठी कोळी भाऊसाहेब ,पोलिस पाटील सतिश पाटील यांनी परिश्रम घेतले तर कॅम्प यशस्वी करण्यासाठी मेजर जोतीराम लावंड, उपसरपंच उमेश विर,अंगणवाडी सेवीका सुष्मा मोरे,प्रमिला गायकवाड, कोतवाल अश्विनी शेंबडे भागवत पेटे,यांनी मोलाचे सहकार्य केले .
पोलिस काॅ .एस डी साळवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .




