-->
करमाळाराजकिय

वीट जिल्हा परिषद गटातून डॉ. ऋतुजा शिंदे इच्छुक; आ. नारायण आबा पाटील व खा.मोहिते-पाटीलांकडे उमेदवारीची मागणी

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

वीट जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. सेवा निवृत्त शिक्षक सुरेश शिंदे गुरूजी यांच्या कन्या डॉ. ऋतुजा सुरेश शिंदे या वीट जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

 

सेवानिवृत्ती समारंभात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण आबा पाटील, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत तसेच परिसरातील शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी शिंदे गुरूजी यांनी राजकारणात यावे, असा आग्रह व्यक्त केला होता. दरम्यान, वीट जिल्हा परिषद गटात महिला सर्वसाधारण आरक्षण लागू झाल्याने या गटातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी आपल्या कुटुंबातील महिला उमेदवारांना पुढे केले आहे. त्यात डॉ. ऋतुजा शिंदे यांचे नाव पुढे आले आहे.

 

डॉ. ऋतुजा शिंदे यांनी मुंबईतील तेरणा कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून, त्या उच्चशिक्षित, तरुण आणि सामाजिक जाण असलेल्या उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. शिक्षक कुटुंबातून येत असल्याने शैक्षणिक विकास आणि आरोग्य विषयक कार्यात त्यांची विशेष आवड आहे.

 

सुरेश शिंदे गुरूजी यांनी आमदार नारायण पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना भेटून कन्येच्या उमेदवारीसाठी आपली भूमिका मांडली आहे. उमेदवारी मिळाल्यास आम्ही ताकदीने लढू, असे त्यांनी सांगितले.


संधी मिळाल्यास प्रभावी काम करू – डॉ. ऋतुजा शिंदे

राजकारण हा आमच्या कुटुंबाचा पिंड नाही; पण जनसेवेची आवड आहे. सुशिक्षित लोक राजकारणापासून दूर राहतात, म्हणून योग्य लोकांना संधी मिळत नाही. मला संधी मिळाल्यास विकासकामांसोबत महिला, युवती आणि प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करेन.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close