पिंपळवाडी येथील श्रीहरी भारती यांचे निधन; श्री कमला देवी कन्या विद्यालयात श्रद्धांजली अर्पण
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे पिंपळवाडी गावचे रहिवासी तसेच पुणे विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक आणि करमाळा श्री कमलादेवी कन्या विद्यालयाचे सल्लागार श्रीहरी भिवा भारती यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे प्रभावी योगदान तसेच त्यांची या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांशी असणारी जवळीक वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे समाजातील सर्व घटकातून त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना श्री कमला देवी कन्या विद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याप्रसंगी त्यांच्याविषयी बोलताना संस्थेचे संचालक मा. घनश्याम भाई गांधी म्हणाले की, त्यांच्या जाण्याने आम्ही आमचा एक सच्चा मार्गदर्शक, सहकारी हरवला आहे.
याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. गणेश भाऊ चिवटे, श्री. सचिनजी साखरे तसेच मा. मुख्याध्यापिका श्रीमती मुक्ता शेलार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



