
प्रतिनिधी/संजय साखरे


राजुरी ता. करमाळा येथील पद्मावती देवी मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते आज पार पडला. आ. संजयमामा शिंदे यांनी २५/१५ या योजनेअंतर्गत सुचवलेल्या राजुरी -शिंदे वस्ती येथील सभामंडपाचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये पद्मावती देवी व तुळजाभवानी माता या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा व कलश रोहणाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या सभामंडपाचे उद्घाटन आ. संजयमामा शिंदे यांनी केले.
यावेळी बोलताना आ संजय शिंदे यांनी राजुरी गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून गावच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ३३/११ के. व्ही क्षमतेच्या स्वतंत्र वीज उपकेंद्राला व कोर्टी येथील अतिरिक्त ट्रांसफार्मरला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. या दरम्यान आ. शिंदे यांनी राजुरी येथील ओढ्यावर चालू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी शिंदे वस्ती येथील पद्मावती तरुण मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे मार्गदर्शक श्री. प्रल्हाद अण्णा शिंदे यांनी आमदार संजय मामा शिंदे यांचा सत्कार केला.
यावेळी कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत, बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सोलापूर जि. प. माजी सदस्य उद्धव दादा माळी, ॲड. अजित विघ्ने, सतीश शेळके, राजेंद्र धांडे, दादासाहेब निकम, गणपतराव खाटमोडे पाटील, सुभाष अभंग यांच्यासह राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे, युवक नेते आर.आर बापू साखरे, रमणलाल सोळंकी, दत्ता बोबडे, आप्पासाहेब सारंगकर, दादासाहेब सारंगकर, नामदेव जाधव, भानुदास साखरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केले. सूत्रसंचालन संजय साखरे यांनी तर आभार नंदकुमार जगताप यांनी मानले.



