-->
करमाळाकृषी विषयकविशेष

शेलगाव (क) येथील कृषी क्रांती गटाने उभारली विषमुक्त शेतीची व वृक्ष संवर्धनाची गुढी

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

शेलगाव (क) येथील कृषी क्रांती शेतकरी गटाने आज मराठी नववर्ष दिन गुढीपाडव्याचे औचित्य साधून विषमुक्त शेतीची गुढी तसेच वृक्ष संवर्धनाची गुढी उभी केली. विषमुक्त शेतीच्या गुढीमध्ये कीटकनाशके वापरू नका असे सांगतानाच जैविक खते, औषधे वापरा, टेन ड्रम थेरीचा वापर करा, जीवामृत, दशपर्णी अर्क वापरा हा संदेश दिला.

 

शेतीविषयक माहिती मिळावी, ज्ञान मिळावे या हेतूने शेतकरी ग्रंथालय या शेतकरी भवनमध्ये उभारण्यात आले असून या ग्रंथालयामध्ये शेतीविषयक माहितीसाठी अग्रोवन अंक येत असून विषमुक्त शेतीचा प्रचार करणारी पुस्तके व शेती विषयक माहिती देणारी पुस्तके ग्रंथालयात ठेवण्यात आलेली आहेत. याचा फायदा गटाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी निश्चितच होणार आहे.

 

शेतकरी भवन व शेतकरी ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच विषमुक्त गुढी व वृक्ष संवर्धनाची गुढी उभारणी प्रसंगी गावच्या सरपंच सौ. यमुना वीर, उपसरपंच लखन ढावरे, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रतिक गुरव, माजी सरपंच अशोक काटुळे, माजी सरपंच आत्माराम वीर, माजी उपसरपंच कविता वीर, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे, राहुल कुकडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच गटाच्या वतीने सायंकाळी फार्मर कप स्पर्धे अंतर्गत विशेष शेती शाळा प्रोजेक्टरद्वारे शेतकऱ्यांना दाखविण्यात आली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close