-->
करमाळासामाजिक

कविटगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण जगदाळे तर उपाध्यक्षपदी जुलेखा शेख यांची निवड

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री. लक्ष्मण भिमराव जगदाळे यांची तर उपाध्यक्ष पदी जुलेखा शब्बीर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कविटगाव येथे शाळा व्यवस्थापन पुनर्रचना करणेसाठी आज गुरुवार दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणेत आली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी श्री. लक्ष्मण भीमराव जगदाळे यांची व उपाध्यक्ष पदी जुलेखा शब्बीर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर समितीचे सदस्य म्हणून अश्विनी भैरवनाथ कांबळे, सुदर्शन अभिमान माने, कृष्णा हरिदास चिंतामण, राणी भारत भोसले, ताई राजाराम टकले यांची निवड करण्यात आली. इतर सदस्यांमध्ये शिक्षण प्रेमी सदस्य पदी सुभाष रामचंद्र मोहिते, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी म्हणून हरिदास गजेंद्र चौधरी, शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. कृष्णा आण्णा जगदाळे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वरी किसन जगदाळे व प्रतीक्षा गोपाळ लोणकर यांची तर सचिव पदी शाळेचे मुख्याध्यापक
जयश्री नागनाथ शिंदे मॅडम यांची निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी वेळी सरपंच प्रतिनिधी श्री. शिवाजीराव सरडे, उपसरपंच श्री. भाऊसाहेब जगदाळे, माजी सरपंच श्री. जोतिराम आबा भोसले, माजी अध्यक्ष श्री. भैरवनाथ जाधव, माजी उपाध्यक्ष श्री. गणेश जाधव, श्री. प्रदीप शिंदे श्री. प्रदिप जाधव महाराज व बहुसंख्य पालक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नवीन सदस्यांचा सत्कार शाळेच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने करणेत आला. खेळीमेळीच्या वातावरणात या सर्व निवडी पार पडल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close