
प्रतिनिधी l केतुर (माय मराठी न्यूज)


उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या दु:खद निधनाने केतुर (ता. करमाळा) गावावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर केतुर गावातील संपूर्ण व्यापारी पेठ काल दिवसभर व आज दुपारपर्यंत स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली. शांतता, स्तब्धता आणि अश्रूंनी भरलेली ही श्रद्धांजली गावकऱ्यांच्या मनातील अजितदादांविषयीचे प्रेम व्यक्त करत होती.
ग्रामपंचायत केतुर ता. करमाळा यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास आदरांजली वाहिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका प्रवक्ते अजित विघ्ने, उदयसिंह खाटमोडे-पाटील व प्रथमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सामान्य माणसाशी नातं जपणारा, विकासासाठी झपाटलेला आणि ठाम नेतृत्व असलेला नेता आज आपल्यातून निघून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या श्रद्धांजली सभेस सरपंच सचिन वेळेकर, पोलीस पाटील गणपतराव पाटील, उदयसिंह खाटमोडे-पाटील, ॲड. अजित विघ्ने, हरिश्चंद्र खाटमोडे, प्रवीण नवले, ह.भ.प. क्रांतिसिंह महाराज खाटमोडे पाटील, राजसिंह पाटील, सागर पवार, रवींद्र विघ्ने, नितीन कोकणे-पाटील, तुकाराम खाटमोडे ,संतोष खाटमोडे पाटील, बाबासाहेब मोरे, योगेश कोकणे, श्याम ननवरे, धनाजी देवकते, परशुराम पवार, अविनाश साठे, सचिन खराडे, नितीन पतुले, ओंकार जरांडे, हनुमंत गुलमर, राजू ठोंबरे, आबासाहेब येडे, महावीर राऊत, देवकाते गुरुजी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.




