
करमाळा प्रतिनिधी


केम ता. करमाळा येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज सोमवार दि. १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. कदम एस. बी. सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. वाघमारे सर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची आणि बाल दिनाची माहिती सांगितली. तसेच पर्यवेक्षक श्री. सांगवे बी. व्ही सर यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बाल दिनानिमित्त प्रशालेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. कोंडलकर सर यांनी सर्वांचे आभार मानले.




