करमाळा प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील अर्जुननगर येथे दिनांक ३१ जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन अर्जुनगर चे माजी सरपंच अनिल थोरात, उपसरपंच अभिमन्यु धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला भोगे, सोनाली ढवळे यांचे हस्ते संपन्न झाले. या लसीकरण शिबिरामधे अर्जुननगर येथील १४ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधीत लसीचा दुसरा डोस घेतला. तर साधारण २०४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. त्या दृष्टीने गावामध्येच लसीकरण शिबिर आयोजन करावे अशी गावातील नागरिकांची ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण शिबीर आयोजित करण्यासाठी गावचे होतकरू तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात, समाधान भोगे, सरपंच आश्विनी थोरात, राष्ट्रवादी युवती कांग्रेस तालुका संघटक राणी भोगे, ग्रामसेवक मनोज लटके यांनी आमदार संजय मामा शिंदे व वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरवठा व प्रयत्न केले. आमदार साहेब यांनी विशेष शिफारस केली त्यामुळे गावामध्येच लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या लसीकरण शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी देवकर, आरोग्य सेवक दाऊद शेख, समुदाय आरोग्य अधिकारी यांनी उपस्थित राहून नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देऊन लसीकरणानंतर कोणताही त्रास होणार नाही असा विश्वास दिला. नागरिकांनी तोंडाला मास्क व योग्य सामाजिक अंतर ठेवून लसीकरण शिबिरासाठी सहकार्य केले आणि आजचा कार्यक्रम यशस्वी झाला.
सदर कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शहा, आरोग्य सेविका साळवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. संगणक चालक केशव घाडगे व ग्रा.प. कर्मचारी सचिन रोकडे यांनी गावातील नागरिकांची मोबाईल वर ऑनलाईन नोंदणी कोविड ऑपवर केली. तर लसीकरण करण्यासाठी आशा सेविका प्रेमा भोगे, ग्रा.प. सदस्य अमोल पवार यांनी कष्ट घेतले.
लसीकरन पुर्ण झाल्यावर आलेल्या वैदयकीय चमुचे आभार ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ अर्जुननगर यांचे वतीने सरपंच प्रतिनीधी प्रकाश थोरात व ग्रामसेवक मनोज लटके यांनी मानले.




