थकित एफ.आर.पी. साठी कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

वडशिवणे प्रतिनिधी/महेश कामटे


कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखरकारखाना बिजवडी ता. इंदापूर या कारखान्याने ऊस गळीत हंगाम सन २०२० ते २०२१ या वर्षातील एफ. आर. पी. रक्कम एक वर्ष पूर्ण होऊनही शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. ऐण सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
वास्तविक पाहता संचालक व कार्यकारी संचालक गळीत हंगाम सन २०२१- २२ सुरू करून दीपावली करत आहेत व एकीकडे शेतकऱ्यांचे खर्चाने दिवाळं निघाले आहे. ऊस बिल न दिल्याने शेतकऱ्यांनी साखर कारखान्याचा वजन काटा बंद करून कारखाना बंद केला शेतकऱ्यांना बिलाचे चेक देऊन ते बॉंस होतात व दंडाची रक्कम शेतकऱ्यांना भरावे लागत आहे . त्यावेळेस शेतकऱ्यांनी दोन दिवसात ऊस बिल न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या सविस्तर घटनेचा आम्ही आढावा घ्यायचा प्रयत्न केला पण टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत.



