-->
करमाळाविशेषसामाजिक

जिल्हा परिषद शाळा मांगी येथे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून ला होत असते. त्याप्रमाणे आज मांगी येथील शाळेत नूतन कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पोतदार गुरुजी व पोतदार मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात केली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत सुरवात केली आहे. एका वेळी एकच पालक व एकाच विद्यार्थ्याला शाळेत बोलवून त्यांची प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे जमा करून घेतली. आज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व फुगे देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले.

अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे विदयार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.जिल्हा परिषद शाळा मांगी येथे पोतदार दाम्पत्य नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेचे नाव उंचावत असतात. विदयार्थ्यांना पण या शिक्षकांची विशेष गोडी लागली आहे. गेली दोन वर्षा पासून सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे शैक्षणिक सुरवात प्रत्यक्षात करता येत नाही तरी सुद्धा ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिकवण्याच काम हे शिक्षक करत आहेत. त्यामुळे मुलांना अभ्यास करण्याची आवड निर्माण होते आहे. कोरोनाचे संकट असतानाही शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य चालूच ठेवले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close