-->
करमाळाराजकियविशेष

भाजप कार्यालयात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती’ व पंतप्रधान मोदीजींचा ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा मन की बात कार्यक्रमाच्या १०१ व्या भागाचे प्रसारण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीएम मोदी म्हणाले की, हा भाग दुसऱ्या शतकाची सुरुवात आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी त्याचे खास शतक साजरे केले. लोकसहभाग हे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा ‘मन की बात’ प्रसारित करण्यात आली, त्या वेळी जगातील विविध देशांमध्ये, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये, कुठेतरी संध्याकाळ होती तर कुठे रात्र झाली होती. एवढे सगळे असूनही मोठ्या संख्येने लोकांनी वेळ काढून १०० वा भाग ऐकला.

 

पीएम मोदी काशीमधील तमिळ संगमबद्दल बोलले आणि ते म्हणाले की, यापूर्वी आपण मन की बातमध्ये काशी तमिळ संगमबद्दल बोललो होतो. सौराष्ट्र तमिळ संगमबद्दल बोललो. काशी तेलुगू संगम देखील काही काळापूर्वी वाराणसीमध्ये झाला होता. पंतप्रधान पुढे म्हणाले की, एक भारत, श्रेष्ठ भारत, युवा संगम या भावनेला बळ देण्यासाठी देशात असाच आणखी एक अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणाईच्या संगमाचे हे सर्वात मोठे व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले.

 

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, माजी शहराध्यक्ष संजय आण्णा घोरपडे, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, मकाई कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, आजिनाथ कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रणदिवे, तात्याराव शिंदे, किरण बागल, वसीम सय्यद, गजू गाडगे, शिवाजी कुंभार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close