करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयाने प्रत्येक मुल शिकले पाहिजे या उद्देशाने “शिक्षण आपल्या दारी” उपक्रमाअंतर्गत आज गौंडरे या गावातील विद्यार्थी व पालक यांच्या भेटी घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
. आज दिनांक ०७/०७/२०२१ रोजी सालसे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दामाजी श्रीरामे व डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सांगडे सर सहशिक्षक श्री. खाडे सर व श्री. गोफने सर यांनी मेंढपाळ असणाऱ्या पालावर भेट देऊन तेथील मुले व त्यांचे पालक यांच्याशी शिक्षणा विषयी चर्चा करून महत्त्व सांगितले.
त्यावेळी त्यांनी सेतू अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विषयाची प्रत, क्रमिक पुस्तके, वह्या, पेन व इतर शालेय साहित्य कुमारी धनश्री शामराव गोरड इयत्ता आठवी, कुमारी भाग्यश्री श्यामराव गोरड इयत्ता सहावी व जयश्री श्यामराव गोरड इयत्ता तिसरी या मुलींना वाटप केले. त्यांच्या पालकांना अभ्यासा विषयी ही मार्गदर्शन केले. तसेच आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करण्याचे सूचित केले. मुलांना ऑनलाइन शिक्षण प्रवाहात आणण्याविषयी मार्गदर्शन करून मुलांचे शिक्षणा संदर्भातील शंकाचे निरसन केले.




