-->
महिलाविषयकराजकियराज्य

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; ‘ती’ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती?

 

माय मराठी न्युज नेटवर्क

टिक टॉक स्टार पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी होती. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती. पूजा चव्हाण ने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील राहत्या घराच्या इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. या आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास करीत असुन पोलिसांना पूजाच्या मोबाईल मधून बरेच कॉल रिकॉर्ड आढळले आहेत. अधिक तपासासाठी पोलिसांनी पूजा चव्हाण चा मोबाईल फॉरेन्सिक टीमकडे पाठवला होता. त्यानंतर ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. या मध्ये पूजा आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे संभाषण आहे. हे संभाषण पूजाने आत्महत्या केल्याच्या पाच-सहा दिवसा पूर्वी केले असुन माजी वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे ९० मिनिटाचे संभाषण मिळाले आहे. हे संभाषण बंजारा समाजाच्या बोलीभाषेत आहे. या संभाषणाचे भाषांतर चालू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या संभाषणात असलेला आवाज संजय राठोड यांचाच असल्याचे सांगितले जात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येसाठी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. त्यानंतर यावरून चांगलेच राजकिय वातावरण तापले आणि संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात आत्महत्येच्या पाच दिवस आधी झालेल्या फोनवरील संभाषण पोलिसांच्या हाती लागले आहे. मोबाईल मध्ये सापडलेल्या या संभाषण यामधील एक संभाषण तब्बल ९० मिनिटे चाललं होतं. त्यामुळे संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आत्महत्या करण्याच्या तीन ते चार दिवस आधी तरुणीने तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्याशी तब्बल एक तास तीस मिनिटे फोनवरून संवाद साधला होता पोलिसांनी तरुणीचा फोन फॉरेन्सिक टेलर कडे पाठवला होता त्यानंतर ही माहिती पोलिसांना मिळाली आहे संजय राठोड यांच्याशी झालेले संवाद तरुणीने आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड करून ठेवले होते त्यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close