-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

आदिनाथ कारखान्याची निवडणुक महायुतीने एकत्र लढवावी; महेश चिवटे यांची भूमिका

महायुतीचे सरकार आदिनाथला नव संजीवनी देऊ शकते- महेश चिवटे

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नव संजीवनी देऊन करमाळ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक महायुती सरकार मध्येच असून यासाठी महायुतीतील घटक पक्षाच्या तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी. अशी भूमिका आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मांडली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बचाव समितीच्या माध्यमातून बंद पडलेला आदिनाथ सुरू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमोल मदत केली होती. त्यावेळेस जवळपास एक लाख टन उसाचे गाळप झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनी नुकतेच सात कारखान्यांना अकराशे कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन कारखाने वाचविले आहेत.

मी प्रशासक असताना आदिनाथ कारखान्याचा १८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला असून तत्कालीन साखर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी याला शिफारस दिलेली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर आदिनाथ कारखान्याचे विस्तारीकरण होऊन प्रतिदिन दहा हजार मे. टन गाळप करू शकतो. प्रशासकीय काळात आदिनाथ कारखान्याच्या नवीन आठ इंची दोन पाईपलाईन पूर्ण झाली असून आदिनाथची उर्वरित शेतजमीन एका नामांकित केळी रोपे उत्पादन संवर्धन कंपनीने भाड्याने मागितलेली आहे. रस्त्याच्या कडेने जवळपास ३०० व्यावसायिक गाळे काढण्याचे प्रयोजन केले होते. ७०० ते ८०० कोटी रुपये कर्ज असलेले पंढरपूरचे साखर कारखाने सक्षमपणे चालू आहेत. आजिनाथ कारखान्याची सर्व प्रॉपर्टी कर्जापेक्षा जास्त आहे.

यामुळे महायुतीच्या विचाराचे पदाधिकाऱ्यांनी जर एकत्र येऊन कारखाना निवडणूक लढवली तर आदिनाथ वाचू शकतो. यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे, युवा नेते दिग्विजय बागल यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी. अशी भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मांडली आहे.


♦ मध्यस्थाची भूमिका विलासराव घुमरे यांनी पार पाडावी ♦

विलासराव घुमरे हे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे व्याही असून दिग्विजय बागल यांचे ते काका आहेत. दोन्ही, तिन्ही गटात त्यांचे चांगले संबंध असून आदिनाथच्या हितासाठी त्यांनी मध्यस्थीची भूमिका पार पाडावी. अशी मागणी ही चिवटे यांनी केली आहे.


आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांची वरदायिनी असून हा कारखाना वाचवण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घ्यावा. संजय मामांनी समविचारी कार्यकर्ते व पक्षाच्या बरोबर युतीचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य राहील.

सुजित (तात्या) बागल, प्रवक्ते माजी आमदार संजयमामा शिंदे गट

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close