वांगी येथे उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने उजनीच्या पाण्याचे पूजन
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण मंगळवार दिनांक ०६ सप्टेंबर रोजी रात्री १०० % भरले आहे. त्यामुळे उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने शेकडो धरणग्रस्तांनी ढोल ताशांच्या गजरात वांगी नं. १ येथे उत्साहात उजनी धरणातील पाण्याचे विधीवत पूजन आज बुधवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी उजनी धरण शंभर टक्के भरल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. यावर्षी गतवर्षी पेक्षा धरण एक महिन्यापेक्षाही जास्त दिवसांनी संथ गतीने भरले. परतीच्या पावसाने तरी धरण भरते की नाही या चिंतेत उजनी जलाशयाच्या काठावरील शेतकरी होते. परंतु, संथगतीने का होईना पण धरण शंभर टक्के भरले. त्याचा आनंद आज उजनी धरणग्रस्तांनी ढोल ताशांच्या गजरात खणा नारळानी ओटी भरून पूजन करून साजरा केला.
या प्रसंगी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर, महेंद्र पाटील, आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके, वांगीचे सरपंच विठ्ठल शेळके, युवा कार्यकर्ते सचिन देशमुख, तानाजी देशमुख, लोकविकास डेअरीचे दिपक आबा देशमुख, आबू तळेकर, वांगी सोसायटीचे माजी संचालक तुकाराम आप्पा देशमुख, वांगीचे उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे, सदस्य डाॅ. भाऊसाहेब शेळके, गौतम नाना मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख, विकास पाटील, तात्या मामा सरडे, संघर्षशिल कार्यकर्ते अर्जुन आबा तकीक, शेतकरी संघटना प्रमुख हनु यादव, बंकट कदम, दत्ता बापू देशमुख, सुधीर देशमुख, ॠषीकेष देशमुख, ढोकरीचे सरपंच किरण बोरकर, उपसरपंच दत्ता खरात, तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब महानवर, जयराम सांगवे, गणेश पाटील, चांगदेव देशमुख, उदय देशमुख, सतिश शिंगटे, धीरज देशमुख नलवडे, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ अजिनाथ देशमुख, वामन सरडे आदि शेतकरी उपस्थित होते.




