-->
करमाळा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतून करमाळा तालुक्यातील ७ स्वयंसेवक विशेष रेल्वेने अयोध्येला जाणार

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मध्ये प्रभु श्रीरामलल्ला ची भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिराची ओढ भक्तांना लागल्याने प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. यामुळे विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकासाठी अयोध्या धाम येथील श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील सात स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.

 

ही विशेष रेल्वे २० डब्याची असून तिची १४४० एवढी प्रवासी क्षमता आहे. ही विशेष रेल्वे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून त्यानंतर रात्री ९:०० वाजता नगर येथून मनमाड मार्गे सुटणार असून दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी अयोध्या धाम येथे पोहोचनार आहे. सर्व स्वयंसेवक रामभक्तांची निवास व्यवस्था कारसेवापुरम येथे असेल. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर ही विशेष रेल्वे मनमाड, दौंड, पुणे मार्गे कोल्हापूर साठी निघणार असून दि. १८ फेब्रुवारी रोजी पुणे व कोल्हापूर येथे पोहोचेल.

 

अयोध्या धाम येथे होणार्‍या दर्शनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतून करमाळा तालुक्यातील सात स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रमोद फंड, अनंता मसलेकर, संघर्ष दयाळ, विश्वजीत निंबाळकर, शुभम रोकडे, विनोद इंदलकर व भुजंग गोरे या सात जणांसाठी अयोध्या धाम येथे होणाऱ्या दर्शनासाठी विशेष पास ची सोय केलेली असून त्यांची जाण्याची व्यवस्था दौंड रेल्वे स्टेशन येथून करण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close