
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


थोर साहित्यिक व समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बापू निळ सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून व श्री. अशोक जावळे सर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना विद्यालयाचे सहशिक्षक श्री. काळे सर म्हणाले की, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत: च्या घरदाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज स्त्रीया, आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे सहशिक्षक हरिदास काळे सर, यशवंत कोळेकर सर, वैजिनाथ भोईटे सर, सुखदेव गिलबीले सर, संतोष पुराणे सर, उत्तम हनपुडे सर तसेच कर्मचारी विजय नीळ सर, साळवे, तांबोळी, नलबे व विद्यार्थी उपस्थित होते.



