-->
करमाळाविशेष

केमचे ऊत्तरेश्वर देवस्थान एक जागृत शिवलिंग; वाचा केमच्या ऊत्तरेश्र्वराची अख्यायिका

 

केम प्रतिनिधी/ संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथे श्री. ऊत्तरेश्वर बाबांचे प्राचिन हेमांडपंथी मंदिर आहे. या गावातील जागृत ग्रामदैवत शिवलिंग असलेले ऊत्तरेश्वर देवस्थान आहे. या गावचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कुंकू हे सौभाग्याच लेणं या गावात तयार होते. या गावची यात्रा फाल्गुन शु २ ते ३ या काळात भरते. तसेच श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. परंतु गेल्या वर्षी पासून कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर ओस पडले आहे. या देवस्थानची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे.

पुर्वी ऊज्जेनचा चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो दानशूर धार्मिक राजा म्हणून परिचित होता. या राजाला संतती नसल्याने तो मनोमन नाराज होत असे. पुढे कालांतराने त्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचा नामकरण विधी करण्यात आला. त्या राजपुत्राचे नाव क्षेम हे ठेवण्यात आले. राजकुमार क्षेम हा कुशाग्र बुद्धीचा होता. तो सर्व क्षेत्रात निपून होता, कर्तत्वान पराक्रमी होता, त्याच प्रमाणे सौंदर्याने रूपवान होता. त्या राजपुत्रास चक्रवर्ती राजाच्या कन्येने पाहिले व त्याच्या रूपावर ती भाळली. तिला केव्हा तो राजपुत्र भेटेल व केव्हा दृष्टादृष्ट होईल असे वाटत असे. इकडे क्षेम राजा आनंदाने राज्य करीत होता. चक्रवर्ती राजाने क्षेम राजाला स्वप्न नगरात बोलावले. तेव्हा क्षेम राजा चक्रवर्ती राजाच्या नगरात गेला. क्षेम राजांचे त्या नगरीत हत्ती हर्षाने स्वागत केले. काही कालांतराने त्या राजकन्येचे व क्षेम राजाचे लग्न झाले. तो लग्न सोहळा चार दिवस चालला होता. राजमहालात रोषणाईने महाल सजवला क्षेम राजा राजमहालात निघाला तेवढ्यात क्षेम राजावर दैवाने घाला घातला. त्याच्या संपूर्ण शरीराची दुर्गंधी सुटली सर्व शरिरातून रक्त, पू वाहू लागले.

वैभव, श्रृंगार, फुलांची शैऱ्या जागेवर सुकून गेली. एके दिवशी ऊज्जेनहून पांथस्थ आले. ते त्रिकालदासी होते. ते ज्योतिषशास्त्र जाणत होते. क्षेम राजाने त्यांना आपल्या पत्नीसह साष्टांग दंडवत घातला व घडला प्रकार सांगण्यास सुरूवात केली. दिवसा शरीर उत्तम असते पण रात्री दुर्गंधी सुटते असा प्रकार ऐकल्यानंतर त्या साधुने डोळे मिटले व अंतज्ञानाने उत्तर दिले. तू मागील जन्मी एका सावरकरांचा पुत्र होता. संपूर्ण गावची सूत्रे तुझ्या हातात होती. त्याच नगरात एक गरीब माणूस राहत होता. लोकांच्या आश्रया वरून त्याची उपजिविका चाले. त्याची पत्नी सुंदर होती. तू त्या स्त्रीला घरी बोलावून तुझ्या मनाची ईच्छा पुर्ण केली. तिला धनाचे अमिष दाखविले, तिने स्वगृहि जाऊन घडला प्रकार सांगितला. तेंव्हा त्या पांथस्ताने शाप दिला कि, तुझा जन्म राजवंशात होईल, राजकुमार होशील आणि ज्या दिवशी तुझा राणीशी संभोग असेल, त्या दिवशी तुला रक्तपिती होईल. असे त्या साधूने क्षेम राजाला सांगितले. त्यानंतर त्या साधुने क्षेम राजाला एक उपाय सांगीतला कि, तुम्ही दोघे ऊज्जेन नगरी सोडून दक्षिणेकडे जा. दरकोस दर मुक्काम करीत एक कुंड लागेल. त्या कुंडातील अद्भभूत प्रचिती तुला येईल. साक्षात शंकराने क्षेम राजाला सांगितलेले ते कुंड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सात लिंगाचे दर्शन होईल व त्या कुंडात तु ज्या दिवशी स्नान करशील त्याच दिवसी तू शापमुक्त होशील असे त्या साधुने सांगितले. त्या प्रमाणे चालतच करमाळा येथील भवानी मंदिरात दरकोस मुक्काम करीत राजा आपल्या पत्नीसह पोहचला. सकाळी नेहमीप्रमाणे चालत माळवाडि (मलवडी) येथे पोहचला. तिथे त्यानी रात्री मुक्काम केला पहाटे त्याला माळवाडिच्या दक्षिणेकडे क्षेम (केम) नगरी एक झरा दिसला. रात्र झाल्याने त्याने तो झरा हाताने स्पर्श केला व तो पाणी प्यायला तो पर्यंत एक चमत्कार घडला राजाची व्याधी नष्ट झाली. राजाला आनंद झाला त्याने सेवकांना बोलावून घेऊन तो झरा उकरून काढला. त्याने त्या कुंडात स्नान केल्याने तो शापमुक्त झाला. राजाच्या सेवकाने तो झरा उकरून काढला त्या मध्ये सात लिंग सापडली. त्या नगराला राजाने क्षेम नगरी असे नाव दिले. हे सात लिंग म्हणजे केम गावचे ग्रामदैवत श्री. ऊत्तरेश्वर महाराजांचे भाऊ मलवडी येथील रामेश्वर, विझोरा येथील महादेव घुटकेश्वर, पठारावरील महादेव शंकरेश्वर, मदनैश्वर, केमेश्वर, दक्षिणेश्वर, बसमेश्वर अशी ही सात लिंग स्थापन झाली आहेत. त्यामुळे हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close