पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळेच कोळगाव सब स्टेशनचा प्रश्न मार्गी; भाजपाचे गणेश चिवटे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


कोळगाव (ता. करमाळा) येथील सबस्टेशन वर आधारित पाच ते सहा गावातील शेतकऱ्यांचा गेली अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला विजेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. कोळगाव सबस्टेशन वरील आधारित शेतकऱ्यांनी भाजपाचे गणेश चिवटे यांच्याकडे शेतीपंपाच्या वीजे संदर्भात तक्रार केली होती. यावेळी गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष देऊन कोळगाव सबस्टेशनसाठी आवश्यक असणाऱ्या दोन ब्रेकरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या भागातील गावांना अपुऱ्या दाबाने होत असलेला वीज पुरवठा आता पूर्ण दाबाने आठ तास सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. या नवीन ब्रेकरचे पूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गणेश चिवटे म्हणाले की, कोळगाव सबस्टेशनचा गेली अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष लक्ष देऊन मार्गी लावला आहे. लवकरच ते या सबस्टेशनवर 3 KVA ऐवजी 5 KVA चा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून या सबस्टेशनचा प्रश्न कायस्वरूपी मार्गी लावतील. तसेच या भागातील रस्ते व इतर कामेही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावू असे मत गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, कोळगावचे सरपंच तात्यासाहेब शिंदे, गौंडरेचे सरपंच सुभाष हनपुडे, हिसरे गावचे सरपंच नवनाथ जगदाळे, वंचित बहूजन आघाडीचे नेते सुभाष ओहोळ, श्रीमंत पाटील, गणेश महाडीक, नाना अनारसे, वैजिनाथ चव्हाण, भाऊ चव्हाण, अजय डौले, विशाल घाडगे, रावसाहेब पाटील, दत्ता विटुकडे, ओमकार पूजारी, नाना पुजारी, भागवत पाटील, पै. विजय विटुकडे, पै. हनुमत पाटील, गणेश रोकडे, ज्ञानेश्वर बिचीतकर, अक्षय हनपुडे, समाधान शिंदे, अतुल चेंडगे, चरण चेंडगे, हंनुमत आतकरे, सुनील जगदाळे, तात्या जगदाळे, उमेश जगदाळे, सौरभ जगदाळे, रामा कराडे, सिध्देश्वर जगदाळे, भिमराव जगदाळे, दत्ता ठोंबरे, संतोष जगदाळे, आत्माराम खडके, वैभव खडके, युवराज पाटील, आबा पाटील, नितीन शिंदे, मिलिंद रोकडे, गणेश रोकडे, दया चेंडगे, समाधान शिंदे, बालाजी गोरे, निखिल वीर, श्रीमंत मोरे, पिंटू निंभोरकर, सचिन माने, हनुमंत अतकरे, अभी शिंदे, राजाराम हराळे, चरण शिंदे, परशुराम शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.
कोळगाव सब स्टेशन वर आधारित आमच्या पाच ते सहा गावांचा विजेचा प्रश्न प्रलंबित होता आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला परंतु हे काम मार्गी लागले नाही. पण गणेश चिवटे यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले.
सुभाष हनपुडे,
सरपंच, गौंडरे.



