-->
करमाळाक्राईम

‘पहलगाम’ दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस; करमाळ्यात एकावर गुन्हा दाखल

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

शेलगाव वांगी (ता. करमाळा) येथील युवकाने पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली.

याबाबत तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी राजुरी येथे घरी असताना माझा मित्र नागेश पंडीत वाळुंजकर (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) याने मला सांगितले कि, मोबाईलवर शेलगाव वांगी येथे हिंदू समाजाच्या भावना भडकवणारे कोणीतरी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे. आज दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ०८.४५ मिनीटांनी माझे मोबाईलवर सदर स्टेटसचा फोटो मी नागेष वाळुंजकर याचेकडुन मागवुन घेऊन त्या स्टेटसच्या फोटो ची पाहणी केली असता अजहर असिफ शेख (रा. शेलगाव वांगी) याने त्याचे मोबाईलवर व्हॉटस्अप स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर ठेवुन सामाजिक भावना दुखावुन जातीय तेढ निर्माण केला आहे.

 

अजहर असिफ शेख याच्या व्हाट्सअप अकाऊंटवर त्याने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ समाजात तेढ व तणाव निर्माण होईल असा मजकूर/स्टोरी स्टेटसला ठेवून दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध चिथावणी दिली. तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली म्हणून या विरुद्ध विहिंप, बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close