-->
आरोग्यराज्यविशेष

कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये पोलिओ लसीकरण मोहीम फत्ते; १७१९ लाभार्थ्यांना मिळाले डोस

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्लस पोलिओ अभियानाच्या अंतर्गत १७१९ मुलांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. याची औपचारिक सुरुवात विद्यमान सरपंच अमोल शहाजी गव्हाणे यांच्या हस्ते मुलाला डोस पाजून करण्यात आली.

 

 

यावेळी बोलताना अमोल गव्हाणे यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक सुविधा कोरेगाव भीमा येथील नागरिकांना देण्यासाठी आरोग्य विभागाच्या बरोबरच ग्रामपंचायत देखील खांद्याला खांदा लावून असते. तसेच या अभियानात मुलांना न चुकता घेऊन येणाऱ्या पालकांचे स्वागत यावेळी अमोल गव्हाणे यांनी केले. कोरेगाव भीमा गावठाण, नरेश्वर वस्ती, पंढरीनाथनगर, ढेरंगे वस्ती, फडतरे वस्ती तसेच वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी येथे प्लस पोलिओ अभियानाच्या अंतर्गत लसीकरण पार पडले. या प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी भेटी दिल्या.

 

 

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. संध्या कारंडे, आरोग्य सहाय्यक गंगाराम कोकडे, अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष थिटे, अंगणवाडी सेविका चारुशीला गव्हाणे, कविता कांबळे, आशा सेविका मंगल खरात, वैशाली शेळके, सुनीता काकळीज, तुळजा खडादार यांनी मुलांना पोलिओ चे डोस देण्यासाठी जनजागृती व नियोजन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close