
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा शहरातील गायकवाड चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी ५.३० वाजता करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी चे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी साठी १,५१,१११/- रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या दहीहंडी साठी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.
विविध शहरामध्ये दहीहंडी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. करमाळा तालुक्यातील नागरिकांना अशाच प्रकारच्या दहीहंडी आपल्या गावामध्ये बघता यावी. यासाठी या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दहीहंडी फोडण्यासाठी अनेक तालुक्यातून विविध संघ येणार आहेत. या दहीहंडी चे आकर्षण म्हणजे स्टेज च्या पाठीमागे ३० फुटी श्रीकृष्णाची प्रतिमा, आकर्षक म्यूझिक आणि लाईट सिस्टीम असणार आहे. सोबतच सहा थरांची विशेष सलामी ही दहीहंडी फोडण्यासाठी बाहेरून येणारे पथक देणार आहेत. तरी या उत्सवासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन गणेश चिवटे यांनी केले आहे.




