
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


- दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करमाळा शहरातील जीन मैदान येथील शॉपिंग सेंटर मध्ये आज शनिवार दि. ०२ नोव्हेंबर रोजी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याकडे एक वर्षापासून अधिक काळ अडकलेले शेतकऱ्यांचे ऊसबिल शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही खूप आंदोलने केली. शेतकऱ्यांसाठी केलेली ही सर्व आंदोलन आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने केली आणि त्यात आम्हाला यश ही मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले हे संपर्क कार्यालय भविष्यात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे असेही ते शेवटी बोलताना म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, कामगार अध्यक्ष सुहास काळे, बापू फरतडे, तालुका कार्याध्यक्ष बापू वाडेकर, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे, नाना नलवडे, दीपक फरतडे तसेच मिरगव्हाण, सोगाव, देवळाली, वीट, पोटेगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



