-->
करमाळाराजकिय

जेऊर बसस्थानक पुनर्बांधणी कामाचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आ. नारायण पाटील यांचे हस्ते भुमिपुजन

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे माध्यमातुन व माजी आ. नारायण (आबा) पाटील यांचे प्रयत्नातुन जेऊर बसस्थानकाच्या पुनर्बांधनीसाठी ३ कोटी ४२ लाख रुपये एवढा निधी उपलब्ध झाला असुन या परिसरातील नागरीकांशी चर्चा करुन बसस्थानकाचे डिझाईन योग्य पद्धतीने बनवण्यासंदर्भात आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांना सुचना केल्या आहेत.

 

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या कामासाठी दि. १९ जून २०२३ रोजी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना पत्र देऊन सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, टेंभुर्णी व करकंब या तीन ठिकाणच्या बस स्थानकांची पुनर्बांधणी व अद्ययावतीकरन यासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार सर्व प्रशासकीय मंजुरी मिळून जेऊर व टेंभुर्णी बसस्थानकाच्या पुनर्बांधनी व नूतनीकरणसाठी निधी उपलब्ध झाला आहे.

 

जेऊर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेस दि. ३१ मे २०२४ रोजी मंजुरी मिळाली आहे. त्याप्रमाणे या कामाचे भूमिपूजन जेऊर बसस्थानक येथे करण्यात आले. या निधीतून जेऊर बसस्थानकास नवीन बस इमारत, वॉल कम्पाउंड, पेव्हर ब्लॉक, वीज व सांडपाणी व्यवस्था इ. कामे केली जाणार आहेत.

 

यावेळी मा.जि.प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, नवनाथ बापु झोळ, प.स. माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे, शहाजीराव देशमुख, अदिनाथचे प्रशासकीय संचालक डाॅ. वसंत पुंडे, दिपक देशमुख, देवानंद बागल, मा.जि.प. सदस्य बिभिषण आवटे, धुळाभाऊ कोकरे, राजाभाऊ कदम, विकास गलांडे, दत्ता सरडे, अजित तळेकर, प्रवाशी संघटनेचे सुहास सुर्यवंशी, डाॅ.अमोल घाडगे, महेंद्र पाटील, बंडु माने, नितीन आढाव, अमरजित साळुंखे, संदिप मारकड, अमर ठोंबरे, रामेश्वर तळेकर, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांचेसह परिसरातील मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होती.

 

अकलुज, माळशिरस व नातेपुते येथील बसस्थानकाच्या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध केला होता. परंतु, आम्ही या बसस्थानकाचे बिओटी तत्वावर विस्तारीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेवुन तसा प्रस्ताव दिला असून तो अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अकलुज, नातेपुते व माळशिरसचा निधी परत जावु नये यासाठी माढ्यातुन टेंभुर्णी व करकंब बस्थानकाचे नाव घेतल्यानंतर करमाळ्यातुन जेऊरचे नाव सुचवण्यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला विचारणा केली होती. त्यानुसार आम्ही जेऊर बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केल्याने जेऊर बसस्थानकासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

श्री. नारायण (आबा) पाटील माजी आमदार, करमाळा

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close