-->
करमाळाविशेष

कारगिल विजय दिनानिमित्त पोथरेतील वीर सैनिक पत्नी संगीताताई भारत कांबळे यांचा रासपच्या वतीने सत्कार

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

आजपासून २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी घुसखोरी करून कब्जा करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर २६ जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर आपल्या देशाचा तिरंगा पुन्हा एकदा फडकावला. यामुळे दरवर्षी २६ जुलै रोजी ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून देशभर साजरा केला जातो. देशासाठी लढणाऱ्या आणि देशसेवेच्या संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर शूरवीर जवानांची आठवण करुन देणारा हा दिवस आहे.

 

याच कारगिल विजय दिनी पोथरे येथील वीर पत्नी संगीताताई भारत कांबळे यांचे पती वीर सैनिक शहीद भारत कोंडींबा कांबळे रा. अमळनेर ता. पाटोदा जि. बीड यांना देशसेवा करत असताना जम्मु काश्मीर या ठिकाणी १९९८ साली वीर मरण आले.‌ त्यानंतर सौ. संगीताताई कांबळे, मुलगा विकी कांबळे हे पोथरे येथे वास्तव्यास आहेत. २६ जुलै रोजी कारगिल विजयी दिनानिमित्त वीर सैनिक पत्नी संगीताताई कांबळे यांचा पोथरे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 

यावेळी रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सिंह ठाकूर, रासप माजी संपर्क प्रमुख दिपक कडू, सुरेश शिंदे, अजित गोसावी, बाळासाहेब टकले, विकास मेरगळ इत्यादींच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

माझे पती देशसेवेत देशासाठी शहीद झाल्यामुळे आमचा आधार संपलेला आहे. शासनाकडून आम्हाला पाच एकर जमीन वितरीत करून देतो म्हणून शब्द दिला. परंतु, अद्यापही आम्हाला कुठेही जमिंनी मिळालेल्या नाहीत. आमच्या व्यथा शासन दरबारी कोणीही ऐकून घेत नाही यांचे खूप दू:ख वाटते. आमच्या मुलांना शासकीय सेवेत घेतले पाहिजे. तसेच सर्व शासकीय योजनांचा लाभ विनाअट वीर पत्नीला प्राधान्याने मिळायला हवा.

संगीताताई भारत कांबळे, वीर सैनिक पत्नी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close