
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाने आत्मसात करणे काळाची गरज असलेचे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे. आज शुक्रवार (दि. ३१ मे) रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती करमाळा येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय आण्णा घोरपडे यांनीही आपले विचार मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट सर्वांनी अभ्यासून घ्यावा व त्यांच्या प्रेरणेने आपण सर्वांनी कुशल संघटनात्मक काम करावे असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपसरपंच अमोल पवार, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, मकाई कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलभाऊ शिंदे, मिरगव्हाणचे सरपंच मच्छिंद्र हाके, दहीगावचे उपसरपंच लक्ष्मण शेंडगे, वस्ताद अजिनाथ कोळेकर, दादासाहेब देवकर, अशोक सातपुते, दीपक शेळके, सोमनाथ घाडगे, भैया गोसावी, प्रवीण शेळके, संदीप रेगुडे, जयंत काळे पाटील, प्रकाश ननवरे, किरण बागल, किरण शिंदे, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, रेणुका राऊत, पूजा माने, चंपावती कांबळे, संजय जमदाडे, विवेक अवसरे, ऋषिकेश घाडगे, दादासाहेब गाडे, बंडगर गुरुजी, संजय किरवे, शरद कोकीळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




