-->
करमाळाकृषी विषयकविशेष

नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये शेतकरी मुलाखत उपक्रम साजरा

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा येथील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडीयम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये आज दि. (१४ जुलै) रोजी ‘शेतकरी मुलाखत’ हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब बागल व शिवाजी ढेरे हे होते.

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे परंतु सध्याच्या युगात मुलांना शेती विषयी जास्त ज्ञान नाही. आधुनिक जीवनशैलीमुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही खूपच बदलत चाललेला आहे. शेतकरी आहे म्हणूनच आपण आहोत. कितीही तंत्रज्ञान विकसित झाले तरी अन्नधान्य पिकवण्याची फॅक्टरी अजूनही तयार झालेली नाही. अन्नधान्यासाठी अजून आपल्याला शेतीवरच अवलंबून राहावे लागते. मुलांनाही शेती विषयी ज्ञान मिळावे म्हणून शेतकरी मुलाखत उपक्रम घेण्यात आला. यामध्ये मुलांनी शेती विषयी त्यांना असणारे बरेचसे प्रश्न अध्यक्षांना विचारले आणि अध्यक्षांनी त्या प्रश्नांची समाधानकारक अशी उत्तरे मुलांना दिली. तसेच मुलाखत म्हणजे काय ही संकल्पनाही मुलांना प्रत्यक्षात समजली.

 

शाळेच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता देवी मॅडम यांनीही शेतकऱ्याचे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे याविषयी खूप छान सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहिते मॅडम यांनीही मुलांना माहिती दिली. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी अध्यक्षांच्या स्वागतापासून ते सूत्रसंचालन तसेच ईतर सर्व जबाबदाऱ्या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. हा उपक्रम साजरा करण्यासाठी सौ. अश्विनी देशमाने मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close