-->
करमाळा

करमाळा येथील नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा

 

प्रतिनीधी/अंगद भांडवलकर

 

श्री. गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना कविता लेखन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव भेटावा या हेतूने कविता लेखनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहिते तसेच शिक्षिका सौ. पल्लवी ढाळे या होत्या.

 

या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वलिखित छान छान कविता सादर केल्या. तसेच सौ. काळे मॅडम यांनी हिंदी दिवसाचे महत्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर देशमाने मॅडम यांनी इयत्ता पहिली ते चौथी मध्ये हिंदी विषयाबाबत जी स्पर्धा घेण्यात आली होती त्यातील विजेत्यांची नावे जाहीर केली. या स्पर्धेतील विजेत्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच त्यांनी हिंदी दिवसाबद्दल आपले मनोगत व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शाळेच्या संस्थाचालिका सौ. सुनीता देवी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संस्कृती काळे व संस्कृती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close