केम येथील श्री उत्तरेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

केम/प्रतिनिधी


श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथे आज शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात केम गावच्या सरपंच सौ. सारिका प्रवीण कोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला ज्येष्ठ नेते दिलीप दादा तळेकर यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष गणेश तळेकर, उपाध्यक्षा पल्लवी रणशृंगारे, सचिन रणशृंगारे, केमचे ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब, केम मंडलचे सर्कल भाऊसाहेब, केम पोलीस स्टेशनचे जाधव साहेब, उपसरपंच अन्वर मुलाणी, ज्येष्ठ पत्रकार राहुल रामदासी, ए.पी.ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका तळेकर, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षाताई चव्हाण, दादासाहेब पारखे (मा. पंचायत समिती सदस्य) बापू तळेकर, सतीश खानट, ग्रा.पं. सदस्या पुष्पा शिंदे, ग्रा.पं. सदस्य सागर कुरडे, ग्रा.पं. सदस्य विजयसिंह ओहोळ, ग्रा.पं सदस्या ऋतुजा ओहोळ, ग्रा.पं सदस्या कमल अवघडे, श्री उत्तरेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, विश्वस्त मनोजकुमार सोलापुरे, मोहन आबा दोंड, विजय तळेकर, हरिभाऊ तळेकर, शाळा व्यवस्थापन सदस्य लक्ष्मण गुरव, विजयकुमार तळेकर, गोसेवक परमेश्वर तळेकर, केम शहर भाजप अध्यक्ष गणेश तळेकर, युवासेना जिल्हा संघटक सागरराज तळेकर, राहुल आबा कोरे, संभाजी गुरव, अरुण लोंढे, मधुकर लोंढे (सर), सुरवसे के.आर (सर), बोंगाणे मामा, बाळासाहेब ननवरे, सुनील भोसले, डी.डी. तळेकर (सर), सिराज मोमीन, राजाभाऊ दोंड, सलमा झारेकरी, अमृता दोंड, कल्पना तळेकर, खरवडे, अमोल तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती मधील सर्व सदस्य, प्रशालेतील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी केम ग्रामपंचायती तर्फे विद्यार्थ्यांना शेंगदाणे लाडू देण्यात आले. सागर दोंड, बाळासाहेब म्हेत्रे, आंनद शिंदे, दत्तात्रय (काका) कुलकर्णी यांनी खाऊसाठी देणगी दिली. तसेच जय महाराष्ट्र मंडळ आणि शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था आणि नियोजन प्रशालेचे सहशिक्षक पवार टी.व्ही सर आणि ज्येष्ठ शिक्षक डी.एन तळेकर सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी लॉन्ग मार्चिंग परेड करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणामुळे प्रशालेतील सर्व वातावरण देशभक्तीमय झाले होते. या प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचालन के एन वाघमारे सर आणि कोंडलकर पी.डी सर यांनी केले. मुख्याध्यापक कदम एस बी सर यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



