-->
करमाळाकृषी विषयक

कमलाभवानी शुगरची पहिली उचल २५०० रुपये- चेअरमन विक्रमसिंह शिंदे

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा तालुक्यातील पांडे येथील कमलाभवानी रिफाइंड शुगर साखर कारखाना चालू गाळप हंगामासाठी पहिली उचल प्रति टन २५०० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी केली. आज बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी कमलाभवानी साखर कारखान्याच्या ८ व्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ सोलापूर जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सूर्यकांत भाऊ पाटील यांच्या शुभहस्ते व विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचे संचालक सुरेश बापू बागल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी चेअरमन विक्रमसिंह शिंदे बोलत होते. या प्रसंगी सुनील सावंत, सूर्यकांत पाटील, सुहास गलांडे सर यांची भाषणे झाली.

 

पुढे अधिक बोलताना ते म्हणाले की, कारखान्याने गेल्या वर्षी गाळप केलेल्या ऊसाला प्रति टन २४०० रुपये दर दिला आहे. साखर कारखानदारीचे यंदाचे व पुढील वर्ष अडचणीचे असल्याने आपण लवकरच डिस्टलरी प्रकल्प कार्यान्वित करून शेतकऱ्यांच्या उसाला माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास दर देऊ असेही त्यांनी सांगितले. साखर कारखान्याविषयी सरकारची धोरणे चुकीची असून त्याचा फटका कारखान्याबरोबर शेतकऱ्यांना बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. जगातील इतर साखर उत्पादक देशांच्या तुलनेत भारतात साखरेचा दर कमी असल्याचे नमूद करतानाच पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देता येत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

 

या कार्यक्रमासाठी सोलापूर जि.प. सदस्य आप्पासाहेब उबाळे, गौंडरेचे माजी सरपंच दिनकर सांगळे, कोंढारचिंचोलीचे प्रगतशील बागायतदार सुहास गलांडे, आदिनाथचे माजी संचालक किरण काका कवडे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी सरचिटणीस सुनिल सावंत, टाकळीचे माजी सरपंच डॉ. गोरख गुळवे, बाळकृष्ण भाऊ सोनवणे, परांडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष धनंजय पाटील, धनंजय झिंजाडे यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री भोसले साहेब यांनी केले. तर आभार प्रशासन अधिकारी श्री जगताप साहेब यांनी मानले.

कामगारांना पगारवाढ:-

यावेळी ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांना २२०० व ७५ टक्के पेक्षा कमी उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा २००० रुपये पगार वाढ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही दरवाढ १ नोव्हेंबर पासून लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close