-->
राजकियराज्यसामाजिक

माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अभिष्टचिंतन सप्ताह निमित्त ‘या’ गावात वृक्षारोपण

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून विधायक कार्य करत आहात आणि यापुढेही आपण सर्वांनी एकजूट दाखवत आपल्या परिसरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपली संघटन शक्ती वापरली पाहिजे असे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी व्यक्त केले.

लोणीकंद, ता. हवेली येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हवेली चे सरचिटणीस गौरव झुरुंगे यांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली. यामध्ये लोणीकंद गावातील खंडोबा माळ या ठिकाणी विविध प्रकारची अनेक उपयुक्त झाडांची लागवड प्रदिपदादा कंद यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सप्ताह निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण करुन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी विधायक कार्य करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यापुर्वीही खंडोबा मंदिर परीसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली होती.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिपदादा विद्याधर कंद, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा दादासाहेब सातव, गणेश कुटे, माजी उपसरपंच संजय कंद, रविंद्र कंद, केसनंद चे माजी उपसरपंच तानाजी हरगुडे, माजी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी हवेली शिवाजी गोते, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्षा हवेली सुप्रिया गोते, संघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा संदीप सातव, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अमोल शिवले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हवेली तालुका अध्यक्ष अनिल सातव, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी संतोष झुरुंगे, महामंत्री भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हवेली योगीराज शिंदे, माऊली उंद्रे, ओंकार कंद, सिध्दांत लोखंडे, नितीन गावडे, शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष जय कंद, राहुल शिंदे, रविंद्र शिंदे, माऊली कंद, प्रताप महाराज कंद, गणेश झुरुंगे, दिनेश शिंदे, समीर झुरुंगे, तान्हाजी गावडे, चेतन शिंदे, केतन जाधव, निखिल कंद, स्वप्निल होले, प्रवीण ढवळे, विराज कंद, शुभम कंद, पृथ्वीराज कंद, संकेत सुनिल झुरुंगे, संकेत संतोष झुरुंगे, अक्षय जमादार, अजिंक्य टिळेकर, पियुष लोखंडे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक संतोष झुरुंगे यांनी स्वागत अनिल सातव यांनी तर आभार गौरव झुरुंगे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close