-->
करमाळा

नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये दीपावली उत्सव उत्साहात साजरा

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

संपूर्ण भारत देशात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा दीपावलीचा उत्सव असतो. करमाळा येथील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल व ट्विंकलिंग स्टार मध्ये दीपावली उत्सव शनिवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शाळेच्या इमारतीची साफसफाई व सजावट करण्यात आली होती. आकाश कंदील तसेच फुलांच्या माळा, रांगोळी याने सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे सजावटीसाठी लागणारे आकाश कंदील विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवले होते. विद्यार्थी ही रंगीबेरंगी कपड्यांमध्ये शाळेत आले होते. त्यामुळे एकूणच शाळेचे वातावरण उत्साहाचे व आनंदाचे झाले होते.

 

यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री. कन्हैयालालजी देवी सर व संचालिका सौ. सुनीता देवी मॅडम यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी संचालक श्री. विजयकुमार दोशी हे देखील उपस्थित होते. त्यांनी मुलांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहिते मॅडम यांनीही सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ, लाडूचे वाटप करण्यात आले.

या उत्सवामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी आपला सहभाग नोंदवला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close