-->
करमाळाराजकियराज्यविशेष

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करा; युवासेनेची राज्यपालांकडे मागणी

 

करमाळा प्रतिनीधी

 

जालना जिल्ह्यातील अंतरवली सरटा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मराठा समन्वय जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या मराठा समाजातील माता भगिनी, जेष्ठ नागरिक व अल्पवयीन युवकांना पोलीसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा करमाळा तालुक्यातील ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

 

युवासेनेकडुन राज्यपाल रमेश बैस यांना ईमेलद्वारे निवेदन करण्यात आले असून यात म्हटले आहे की, मराठा समन्वयक शांततेत उपोषण आंदोलन करत असताना चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता शेकडोंच्या संख्येने सशस्त्र पोलिसांचे दंगाकाबू पथक तयार करून घटनास्थळी पाठवणे शंकास्पद आहे.

 

आजपर्यंत या देशात आण्णा हजारे यांच्यासह अनेकांनी शांततेत आंदोलने केली. या आंदोलनास संरक्षण देण्यासाठी शासनाकडून खर्च करण्यात आला, मग हेच उपोषण आंदोलन दडपण्यासाठी दंगा काबू पथकास का पाचारण करण्यात आले. असा सवाल देखील युवासेनेकडुन उपस्थित करण्यात आला आहे.

 

या ठिकाणी अनेक महिला अल्पवयीन मुले, जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली असून जवळपास साडेतीनशे च्या वर मराठा आंदोलकांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे अंत्यत संतापजक आहे.

 

कोणाच्या आदेशाने हे पथक घटनास्थळी पोहचले ? हे पथक पाठवण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती का ? लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला? या सर्व घटनाक्रमांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close