-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळेच अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसणार; विरोधकांनी फुकटचे श्रेय घेऊ नये- सरपंच पांडुरंग लबडे

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

शेटफळ भागासह उजनी बॅक वॉटर व संपूर्ण करमाळा तालुक्यातील वीज समस्येबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्याकडे (वाढीव) ट्रान्सफार्मर व नवीन सब स्टेशन उभारणीसाठी मंजुरी मिळावी यासाठीचे पत्र जून २०२४ मध्ये दिलेले होते. संबंधित पत्रामध्ये त्यांनी विजेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने सध्या ३३/११ KV सबस्टेशन कार्यरत असलेल्या सबस्टेशन मध्ये वाढीव ५ MVA ट्रान्सफर्मर बसविणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.

 

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संबंधित पत्रानुसार करमाळा तालुक्यातील कोळगाव, झरे, केम, वीट, उमरड, कविटगाव, शेटफळ व करमाळा शहर या ठिकाणी ५ MVA चे वाढीव ट्रान्सफर्मर मंजूर झाले असून त्याचे संपूर्ण श्रेय माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे आहे. विरोधकांनी शेटफळ येथील ट्रांसफार्मर चे फुकटचे श्रेय घेऊ नये असे आवाहन शेटफळ चे सरपंच पांडुरंग लबडे यांनी केले आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, शेटफळ गावामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला आहे. पाच एम व्ही एस ट्रान्सफॉर्मर चे साहित्य पंधरा दिवसापूर्वी आलेले आहे. सर्वच कामांचे एकत्रित उद्घाटन करण्यासाठी आम्ही थांबलेलो असतानाच विरोधकांनी संबंधित ट्रांसफार्मर चे उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले. जर तो ट्रांसफार्मर त्यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असेल तर त्याचा पुरावा त्यांनी सादर करावा. विनाकारण संजयमामा शिंदे यांच्या कामाचे फुकटचे श्रेय त्यांनी घेऊ नये असा टोलाही श्री. लबडे यांनी लगावला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close