-->
करमाळाकृषी विषयक

जिल्हा परिषद सेस निधी योजनेअंतर्गत अनुदानित कृषी औजारासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत- गणेश चिवटे

 

प्रतिनिधी/करमाळा

 

जिल्हा परिषद सेस निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ५० % व ७५ % अनुदानित कृषी औजारासाठी पंचायत समिती कार्यालय, करमाळा येथे दि. २० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्हा परिषद सेस फंडातून अनुदानावर कृषी औजारे, उपकणे व यंत्र वाटप करण्यात येणार आहे. यानुसार सर्वसाधारण शेतकऱ्यांना ५० % अनुदानावर औजारे मिळणार आहेत. तसेच महिला व दिव्यांग शेतकऱ्यांसाठी ७५ % अनुदान उपलब्ध होणार आहे.

 

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना

पिक संरक्षण औजारे- थ्री पिस्टन स्प्रेपंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रशकटर, सोलर इन्सेक्ट (ट्रॅप)

कृषि अभियांत्रिकी योजना- रोटाव्हेटर, पॉवर टिलर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र/ कल्टीव्हेटर

कृषि सिंचन औजारे- ५/७.५ एच.पी. विद्युत ओपनवेल सबमर्सिबल पंपसंच, ४/५ एच.पी. डिझेल इंजिन

कृषी साहित्य- कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर आदी कृषी औजारे मिळणार आहेत.

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज पंचायत समिती करमाळा यांचेकडे जमा करावेत. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी गायकवाड चौक करमाळा येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन शेवटी चिवटे यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close